Posts

विलियम बेटिंक सुधारणा | Lord William Bentinck

लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश ( Lord William Bentinck)  :  (१४ सप्टेंबर १७७४ — १७ जून १८३९) ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८२७ — ३५).   सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारा पहिला गव्हर्नर जनरल. 1828 साली गव्हर्नर पदी निवड. जन्म : 1774 शिक्षण उरण करून लष्करी सेवेत नौकरीस लागला. नेपोलोअन विरुद्ध युद्धात सहकार्य. आर्थिक सुधारणा - कंपनी च्या उत्पन्नात वाढ न्याय विषयक सुधारणा लोककल्याणकारी सुधारणा शैक्षणिक सुधारणा सती प्रथा बंद केली नरबळी व कन्या वध प्रथा बंद केल्या धार्मिक स्वतंत्र्य स्त्रियांचा व्यापार बंद

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : 17 सप्टेंबर | Marathwada Liberation Day 17 September

Image
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : 17 सप्टेंबर स्वतंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. स्वतंत्र भारतात हैद्राबाद संस्थान सामील करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता. तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने 8 जिल्हे, आंध्रप्रेदश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेन

मानवी हृदय स्थान, कार्य, रचना (Human Heart)

स्थान मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते. वजन - पुरुष – ३४० ग्रॅम्स स्त्री – २५५ ग्रॅम्स कार्य - हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे. हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते. हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते. हृदयाची रचना - मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये १) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium) २) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium) 3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle) ४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle) यांचा समावेश होतो. अलिंदांच्या भ

होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement

होमरुल चळवळीची पार्श्वभुमी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘होमरुल चळवळ’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ मानली जाते. सन १९०६ मध्ये मुस्लीम लीगची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेपासून दूर राहण्यातच आपला स्वार्थ आहे, असे मुस्लिम नेत्यांना वाटत होते. सन १९०९ मध्ये त्यांना विभक्त मतदारसंघ मिळाल्यामुळे ब्रिटिश आपले तारक आहेत असे वाटू लागले होते. परंतु ब्रिटिश सरकारने सन १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द केली, स्वाभाविकच ब्रिटिशांनी आपले स्वप्न भंग केला आहे असे मुस्लिम नेत्यांना वाटू लागले. सन १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. राष्ट्रीय चळवळीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ती पुन्हा सक्रीय करण्याचा निर्णय घेतला. या काळात मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद दूर करण्यात नेत्यांना यश आलेले होते. ब्रिटिशांच्या धोरणावर नाराज असलेल्या मुस्लिम लीगनेही राष्ट्रीय सभेला सहकार्य करण्याचे मान्य केले होते. अशा पार्श्वभूमीवर होमरुल चळवळीचा निर्णय घेण्यात आला. होमरुल चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळीस नवचैतन्य निर्माण करण्याच्या लोकमान्य टिळकांच्या विचारांचे दृश्य स्वरुप म्हणजे होमरुल चळवळ होय.

युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम

जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत. अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे (क्रुसेडस्) म्हणतात. धर्मयुद्धांना पाठिंबा मध्ययुगात धर्मयुद्धाच्या कल्पनेने युरोपमधील सामान्य जनता भारावून गेली होती. या काळातील ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरु पोप यांनी जे लोक धर्मयुद्धामध्ये सामील होतील त्यांना पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने या युद्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला. युरोपातील सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी या युद्धांना कारणीभूत झाली. रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सीरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करायच्या होत्या. यांसारख्या विविध कारणांनी युरोपमधील सत्ताधारी आणि व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. इ.स.१०९६ मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले. दुसऱ्या धर्मयु

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

Image
  आपत्ती म्हणजे काय ? किवा आपत्ती कशास संबोधता येईल? आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात. आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ? ( आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे कोणते आहेत? उत्तर : आपत्ती व्यवस्थापन नाचे 3 प्रमुख टप्पे आहेत- आपत्ती पूर्व व्यवस्थापन - यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन- प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणा मध्ये समन्वय राखणे.  आपत्ती नंतरचे व्यवस्थापन- आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे,इत्यादि नैसर्गिक आपत्ती परिसर भूकंप, ज्वालामुखी, वादळवारे, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्ती माणसाला पुरत्या हतबल करून टाकतात. त्यासाठी सतत सतर्क राहा

भारतातील प्रमुख जमाती आणि राज्य

आपातनी       :      अरुणाचल प्रदेश अबोर         :         अरुणाचल प्रदेश आओ          :         नागाल्यांड अंगामी          :        नागाल्यांड कोल          :         छत्तीसगढ कोटा          :         तामिळनाडू मुंडा           :         झारखंड छुतीया          :       आसाम कोलाम          :       आंध्र प्रदेश गारो             :        मेघालय, आसाम, नागाल्यांड चेंचू            :         आंध्र प्रदेश बैगा           :          छत्तीसगढ,झारखंड भिल्ल          :          राजस्थान, छत्तीसगढ बदगा          :         निलगिरी पर्वत तामिळनाडू भोट           :         हिमाचल प्रदेश लेपचा          :        सिक्कीम वारली          :        महाराष्ट्र चकमा          :        त्रिपुरा गड्डी           :          हिमाचल प्रदेश जयंती          :        मेघालय बोदो           :         आसाम खासी          :        आसाम, मेघालय, नागाल्यांड गोंड           :          महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ लुशिया         :        त्रिपुरा मोपला    

भारतातील सामाजिक सुधारणांविषयक कायदे

सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे. ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते. नंतर पुराण ग्रंथात सती प्रिथेला महत्व प्राप्त झाले.  पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई. काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई. ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत. ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती. काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडमिंटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अ‍ॅमहर

भारतीय पाणबुड्या

१) INS  अरिहंत  आयएनएस अरिहंत (S-73) ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल या गटातील मोडणारी ही भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे.  भारताची ही पहिलीच आण्विक पाणबुडी असून यापूर्वी भारताने रशिया कडून आण्विक पाणबुडी भाडेतत्वावर घेतली होती.  अरिहंतचा अर्थ शत्रूचा नाश करणारी असा होतो. भारतीय नौदलाला अशा आण्विक पाणबुडीची जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यासाठी तीव्र गरज होती. सुमारे तीस हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प यासाठी १९८० मध्ये सुरू झाला. दोन दशके या पाणबुडीची उभारणी चालू होती. ही उभारणी विशाखापट्टणम येथील गोदीत करण्यात आली. अरिहंतची क्षमता  क्षमता - ६,००० टन  लांबी - ११० मीटर  रुंदी - १२ मीटर  आण्विक प्रक्रियक - ८५ मेगावॉट  वेग - २२ ते २८ किमी प्रति तास  शिबंदी - ९५-१०० खलाशी व अधिकारी  क्षेपणास्त्रे - १२ प्रगती  भारतीय बनावटीच्या आय.एन.एस. अरिहंतवरील आण्विक प्रक्रियक ९ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी रात्री कार्यान्वित करण्यात आला. नौदलामध्ये दाखल करून घेण्याआधी आणखी काही चाचण्या करण्यात येतील. २) आय एन एस सिंधुरक्षक  आय. एन. एस. सिंधुरक्षक एक रशियन निर्मित किलो वर्गाची भारतीय नौदल

इंग्रज फ्रेंच युद्ध | कर्नाटक युद्ध

ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला.   यावरून भारतात इंग्रज-फ्रेंच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र पोन्डिचेरी हे होते. शिवाय मछलीपट्टणम, कारिकल, माहे, सुरत व चंद्रनगर हि उपकेंद्रे होती. इंग्रजांचे केंद्र मद्रास, मुंबई व कलकत्ता येथे होते याशिवाय काही उपकेंद्रे होती. कोरोमंडल किनारा व त्याच्या अंतर्गत भागास कर्नाटक असे नाव होते. त्यामुळे या युद्धाना कर्नाटक युद्धे असेही म्हणतात. या सर्व भागावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती.  प्रथम कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८) भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर,  १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी ही तुकडी आली होती.