मानवी हृदय स्थान, कार्य, रचना (Human Heart)

स्थान


मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

वजन -

पुरुष – ३४० ग्रॅम्स स्त्री – २५५ ग्रॅम्स


कार्य -

हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.

हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

हृदयाची रचना -

मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये

१) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
२) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा समावेश होतो.

अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात.
 वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात.
खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.

Popular posts from this blog

कायमधारा पद्धती : ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement

गुणोत्तर व प्रमाण (Ratio and Proportion) | MPSC गणित | MPSC Mathematics

लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)