Posts

Showing posts with the label History

विलियम बेटिंक सुधारणा | Lord William Bentinck

Image
लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश ( Lord William Bentinck)  :  (१४ सप्टेंबर १७७४ — १७ जून १८३९) ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८२७ — ३५).   सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारा पहिला गव्हर्नर जनरल. 1828 साली गव्हर्नर पदी निवड. जन्म : 1774 शिक्षण उरण करून लष्करी सेवेत नौकरीस लागला. नेपोलोअन विरुद्ध युद्धात सहकार्य. आर्थिक सुधारणा - कंपनी च्या उत्पन्नात वाढ न्याय विषयक सुधारणा लोककल्याणकारी सुधारणा शैक्षणिक सुधारणा सती प्रथा बंद केली नरबळी व कन्या वध प्रथा बंद केल्या धार्मिक स्वतंत्र्य स्त्रियांचा व्यापार बंद

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : 17 सप्टेंबर | Marathwada Liberation Day 17 September

Image
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन : 17 सप्टेंबर स्वतंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. स्वतंत्र भारतात हैद्राबाद संस्थान सामील करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता. तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने 8 जिल्हे, आंध्रप्रेदश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेन...

होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement

होमरुल चळवळीची पार्श्वभुमी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘होमरुल चळवळ’ ही एक वैशिष्ट्यपूर्ण चळवळ मानली जाते. सन १९०६ मध्ये मुस्लीम लीगची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेपासून दूर राहण्यातच आपला स्वार्थ आहे, असे मुस्लिम नेत्यांना वाटत होते. सन १९०९ मध्ये त्यांना विभक्त मतदारसंघ मिळाल्यामुळे ब्रिटिश आपले तारक आहेत असे वाटू लागले होते. परंतु ब्रिटिश सरकारने सन १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द केली, स्वाभाविकच ब्रिटिशांनी आपले स्वप्न भंग केला आहे असे मुस्लिम नेत्यांना वाटू लागले. सन १९१४ मध्ये लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. राष्ट्रीय चळवळीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ती पुन्हा सक्रीय करण्याचा निर्णय घेतला. या काळात मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद दूर करण्यात नेत्यांना यश आलेले होते. ब्रिटिशांच्या धोरणावर नाराज असलेल्या मुस्लिम लीगनेही राष्ट्रीय सभेला सहकार्य करण्याचे मान्य केले होते. अशा पार्श्वभूमीवर होमरुल चळवळीचा निर्णय घेण्यात आला. होमरुल चळवळ भारतीय स्वातंत्र्य चळवळीस नवचैतन्य निर्माण करण्याच्या लोकमान्य टिळकांच्या विचारांचे दृ...

युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम

जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत. अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे (क्रुसेडस्) म्हणतात. धर्मयुद्धांना पाठिंबा मध्ययुगात धर्मयुद्धाच्या कल्पनेने युरोपमधील सामान्य जनता भारावून गेली होती. या काळातील ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरु पोप यांनी जे लोक धर्मयुद्धामध्ये सामील होतील त्यांना पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने या युद्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला. युरोपातील सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी या युद्धांना कारणीभूत झाली. रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सीरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करायच्या होत्या. यांसारख्या विविध कारणांनी युरोपमधील सत्ताधारी आणि व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. इ.स.१०९६ मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले. दुसऱ्या धर्मयु...

इंग्रज फ्रेंच युद्ध | कर्नाटक युद्ध

ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला.   यावरून भारतात इंग्रज-फ्रेंच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र पोन्डिचेरी हे होते. शिवाय मछलीपट्टणम, कारिकल, माहे, सुरत व चंद्रनगर हि उपकेंद्रे होती. इंग्रजांचे केंद्र मद्रास, मुंबई व कलकत्ता येथे होते याशिवाय काही उपकेंद्रे होती. कोरोमंडल किनारा व त्याच्या अंतर्गत भागास कर्नाटक असे नाव होते. त्यामुळे या युद्धाना कर्नाटक युद्धे असेही म्हणतात. या सर्व भागावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती.  प्रथम कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८) भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर,  १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण...

लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५)

लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १...

व्हाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४)

व्हाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४) भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो. इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे रिपनने १८८१ मध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी अ‍ॅक्ट पास केला. इ.स. १८३५ मध्ये चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेकॉलेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९ जानेवारी, १८८२ रोजी रिपनने (Vernacular) रद्द केला. रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरिता १८८२ मध्ये हंटर समिती १८५४ च्या वुड्स खलित्याप्रमाणे नेमली. हंटर समितीच्या शिफारशी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली. १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला. रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधतात. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये रिपनच्या कारकिर्दीत झाली. १८८४ मध्ये इलबर्ट बिल मंजूर केले. या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली. १८८४ मध्ये रिपनने राजीनामा दिला.

लॉर्ड लिटन (१८७६-१८८०)

लॉर्ड लिटन ( १८७६-१८८० ) लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली. व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे. १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला. आयसीएस परीक्षेचे वय...