Posts

Showing posts with the label इंग्रज फ्रेंच

इंग्रज फ्रेंच युद्ध | कर्नाटक युद्ध

ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला.   यावरून भारतात इंग्रज-फ्रेंच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र पोन्डिचेरी हे होते. शिवाय मछलीपट्टणम, कारिकल, माहे, सुरत व चंद्रनगर हि उपकेंद्रे होती. इंग्रजांचे केंद्र मद्रास, मुंबई व कलकत्ता येथे होते याशिवाय काही उपकेंद्रे होती. कोरोमंडल किनारा व त्याच्या अंतर्गत भागास कर्नाटक असे नाव होते. त्यामुळे या युद्धाना कर्नाटक युद्धे असेही म्हणतात. या सर्व भागावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती.  प्रथम कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८) भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर,  १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण...