आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

 
आपत्ती व्यवस्थापन

आपत्ती म्हणजे काय ? किवा आपत्ती कशास संबोधता येईल?

आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात.

आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ? ( आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे कोणते आहेत?

उत्तर:
आपत्ती व्यवस्थापन नाचे 3 प्रमुख टप्पे आहेत-
  1. आपत्ती पूर्व व्यवस्थापन - यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे
  2. आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन- प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणा मध्ये समन्वय राखणे. 
  3. आपत्ती नंतरचे व्यवस्थापन- आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे,इत्यादि

नैसर्गिक आपत्ती

परिसर भूकंप, ज्वालामुखी, वादळवारे, पूर, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्ती माणसाला पुरत्या हतबल करून टाकतात. त्यासाठी सतत सतर्क राहावे लागते. या आपत्तींना तोंड देण्यासाठी विशेष प्रशिक्षणांनी युक्त माणसांना सज्ज ठेवावे लागते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑक्टोबर महिन्याचा दुसरा बुधवार राखून ठेवतात व या आपत्तींना आवर घालण्यासाठी करावयांच्या कारवायांची उजळणी करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २२ डिसेंबर १९८९ च्या सर्वसाधारण अधिवेशनात नैसर्गिक आपत्तींना आवर घालण्यासाठी प्रस्तुत दिवसाची घोषणा झाली होती. १९९०-९९ हा काळ नैसर्गिक आपत्तींना आवर घालण्याचे दशक म्हणून घोषित झाले होते व या काळात सदर दिवसाचा सोहळा ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या बुधवारी साजरा होत गेला. 

नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरच्या कितीतरी लोकांची घरेदारे नष्ट झाली आहेत. जीव प्राणास मुकले आहेत. काही आपत्तींमुळे तर देशांचा आर्थिक कणाच मोडून टाकला आहे. त्यासाठी या आपत्तीसंबंधी लोकांना शिक्षित करावे, माहितीची देवाणघेवाण व्हावी, या परिस्थितींना तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळावे याची संयुक्त राष्ट्रसंघाला प्रकर्षाने जाणीव झाली. यासाठी राष्ट्रकुलाने तयार केलेल्या बोधचिन्हात पृथ्वीवरील आपत्तीग्रस्त देश व त्यांच्याभोवती शांतीच्या दर्शक असलेल्या ओलिव्ह वृक्षाच्या फांद्या दाखविलेल्या आहेत. सर्वसाधारण लोकांत सुरक्षिततेची भावना रुजावी, आपत्तीग्रस्त लोकांना त्वरीत आर्थिक, वैद्यकीय मदत मिळावी, आपत्तीच्या काळात नीट व्यवस्थापन व्हावे या उद्दिष्टांनी प्रस्तुत दिवसाचे प्रयोजन असते. दुर्दैवाची बाब म्हणजे जगातली गरीब लोकं या नैसर्गिक आपत्तीचे हमखास बळी होत. अलिकडच्या काळातले त्सुनामी संकट, ज्वालामुखी, भूकंप ही त्याची ताजी उदाहरणे होत. या दिवसासंबंधी जागृती व्हावी यासाठी देशोदेशीची सरकारे प्रसारमाध्यमांना हाताशी धरून एखादी घोषणा उद्यृत करतात व त्याची कारणमीमांसा जनतेला स्पष्ट करतात. 

चित्रकला, निबंध, फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांत तसेच नागरिकांमध्ये आपत्तीकाळात कसा प्रतिसाद द्यायचा यासंबंधी चालना देणारे धडे गिरविले जातात. सभापरिषदांतून भूतकाळातील घटनांतून मिळालेले धडे प्रशिक्षणार्थ वापरले जातात. छोट्या छोट्या गटांना एकत्रित करून अल्प अर्थ सहाय्य करण्याची व त्याद्वारा उद्ध्वस्त झालेली जीवने उभारण्याची संकल्पना खूप उपयोगी ठरल्याचे दिसून आले आहे. तिचे महत्त्व या दिवशीच्या उपक्रमातून सकलांना पटवून दिले जाते. संयुक्त राष्ट्रसंघाचे कॅपिटल डेव्हलप फंड आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स ऍन्ड सोशल अर्फेअर्स या शाखा हातात हात घालून या सोहळ्याचे जगभर नियोजन करीत असतात. लंडनच्या रॉयल सोसायटीत आजच्या दिवशी भलीथोरली परिषद आयोजित करून या विषयाशी निगडित विविध बाबींचा उहापोह होत आहे. शेवटी काय तर, झीर्शींशपींळेप ळी लशींींशी ींहरप र्लीीश हेच तत्त्व याकामी जास्त कामाला येत असते.

आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग

मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण दैनंदिन व्यवहारातही बघतो जर एखाद्या वाहनाला फार मोठा अपघात झाला किंवा एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाली तर त्यांना उपचारासाठी, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी समाजातील अनेकजण धावपळ करतात. एकंदरित सांगावयाचे झाल्यास मानवी संवेदनामुळेच ही सकारात्मक कृती समाजाकडूनच घडते तसेच यामध्ये प्रशासनाच्या वतीनेसुध्दा योग्य ती दखल घेतली जाते, म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा सहभाग ह्यांच नातं फार जवळच आहे. 
भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर केंद्र शासनाने २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे. याचा मूळ उद्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी देखील संकटकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे.
विभागस्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी समन्वय साधण्यात येत असून मान्सूनपूर्व तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात यावी त्यादृष्टीने जिल्हास्तरापासून ग्रामपातळीपर्यंत आराखड्यानुसार कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत. 


आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळी ही देखील महत्वाची आहे. त्यामुळे विविध गट स्थापन करणे आवश्यक ठरते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती आराखडा तयार करणे तो अद्ययावत करणे, विविध कार्यशाळा आयोजित करणे तसेच रंगीत तालीम आदी उपक्रम जिल्हा पातळीवरील कार्यक्रमात राबविण्यात येतात.
तालुका स्तरावरही अशाच प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतात. गाव आपत्ती व्यवस्थापन समिती आदी सदस्यांचे प्रशिक्षण, कार्यलयीन कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांचे प्रशिक्षण तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी पथनाट्य, भितीचित्र, जाहिरात फलक, पोस्टर्स स्पर्धा, आदी कार्यक्रमाव्दारे जनजागृती करण्यात येते. 
स्थानिक पातळीवर आपत्ती व्यस्थापनाची गरज
गावात येणारे महापूर वा अन्य नैसर्गिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनाच हिमतीने सज्ज राहावे लागते. नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. 
दरवर्षी सातत्याने येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी, अकस्मात येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी, अज्ञान तसेच माहितीचा अभाव यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी, कमीत कमी जीवित व वित्त हानी होईल याची खात्री करण्यासाठी आपत्तीला सहज बळी पडणाऱ्या वर्गाचे रक्षण करण्यासाठी, आपत्तीनंतर दैनंदिन जीवन उध्वस्त होऊ नये याची तयारी करावी लागते.
आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृध्द, महिलां तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खातर जमा करण्यासाठी याशिवाय आपत्ती काळात पाणी पुरवठा, जनावरांना चारा, खानपान व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषध सामग्री, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सुरळीत चालतील. याची खात्री करण्यासाठी स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक ठरते. 

विभागस्तरावरुन करण्यात येत असलेल्या उपाय योजना

विभागस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते. याच प्रमाणे जिल्हा व तालुकास्तराव नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नियंत्रण कक्षाची सेवा २४ तास उपलब्ध राहणार आहे.

निर्माण होणारी संभाव्य परिस्थितीला हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. याशिवाय पूरपरिस्थीतीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दुरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दुरसंचार विभाग, रस्त्यांने वाहतूकीचा संपर्क असावा यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. 
आपतकालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, होमगार्डस, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदीचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपतकालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी देखील हिरीरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज आहे.

आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच Disaster Management . हा एक अत्यंत मोठा आणि व्यापक विषय आहे. ह्या विषयावर इंटरनेटवर शोधायला गेल्यास असंख्य पुस्तके, लेख आणि websites मिळतील. ह्या सगळ्याचा इत्भूंत आढावा घेणे तसे अशक्य आहे. तरी देखील आपण व्यवहारात आवश्यक जुजबी माहिती मिळवण्याचा प्रयास नक्कीच करु शकतो जेणे करून आपत्ती सारख्या बिकट परिस्थितीत आपण मार्ग काढून आपले प्राण वाचविण्याचे प्रयत्न नक्की करू शकतो. 

तहान लागल्यावर विहीर खणायला गेले तर काय होईल हे आपण सारे जाणतोच. मग तहान लागण्याआधी जशी पाण्याची सोय करणे श्रेयस्कर असते तसेच आपत्ती आल्यावर जीव वाचविण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा , उपाय शोधण्यापेक्षा संकट निवारणाची उपाय योजना आधी पासूनच आखणे आणि त्याची पूर्वतयारी करून ठेवणे कधीही उचितच असेल, नाही का बरे ?     

चला तर मग आपती व्यवस्थापन म्हणजे काय असते ह्याची माहिती घेऊ या- 
Prevention is betther than cure ही गोष्ट आपणा सर्वांनाच मान्य आहे. कोणताही अपघात घडण्याआधी तो घडू नये म्हणून घेतली गेलेली खबरदारी, सावधानता ही कधी ही हितावहच असते. जसे अपघात म्हणता क्षणी नजरेपुढे प्रथम लक्षात येते तो प्रथमोपचार.आपण सर्वजण प्रथमोपचार म्हणजे First-Aid ह्या बाबत जाणतोच की अपघात वा दुर्घटना प्रसंगी वैद्यकीय मदत मिळण्याआधी त्या जखमेचे संभाव्य परिणाम वा त्यापासून उद्भवणारे धोके कमी करण्यासाठी केले जाणारे सोपे उपाय. जसे भाजल्यावर जखम झालेला शरीराचा अवयव वेदना शमविण्यासाठी थंड पाण्याखाली धरणे वा रक्त प्रवाह थांबविण्यासाठी हळद वापरणे इत्यादी... अगदी तसेच थोडक्यात सांगायचे तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपतींपासून उद्भवणारे जीवित हानी, वित्त हानी, सामाजिक हानी अशा सर्वच पातळींवरील दुष्परिणाम अभ्यासून शक्य तेवढ्या प्रमाणात होणारी हानी कमी करण्यासाठी योजले जाणारे विवीध उपाय आणि उपाय योजना .
आपल्या भारतात तसे पाहिले तर एकाच वेळेस दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी,चक्रीवादळ, आगी, जातीय दंगे, दहशतवाद अशा विवीध प्रकारच्या आपती आढळतात. 
साधारणपणे आपत्तींचे
  1. नैसर्गिक आपत्ती - दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी,चक्रीवादळ इत्यादी. 
  2. मानवनिर्मीत आपती - आगी, जातीय दंगे, दहशतवाद इत्यादी.    
असे वर्गीकरण केले जाते. 
आपला भारत देश हा नैसर्गिक आपत्ती येणारा जगातील सर्वात मोठा देश समजला जातो. अंदाजे भारतात दरवर्षी ५० % भागात भूकंप , ३०% भागात दुष्काळ, १० % भागात पूर येत असतो. तसेच विवीध प्रकारच्या जातीय दंगली, दहशतवाद , आगी ह्या सुध्दा वारंवार घडताना दिसतात.

कोणत्याही प्रकारच्या आपत्ती आल्या की आज आपण सगळे शासनाला दोष देण्यात धन्यता मानतो. परंतु आपण जर एक समजंस नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून वागायला लागलो तर खूप प्रमाणात गोष्टी बदलू शकतील. 


Popular posts from this blog

होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement

कायमधारा पद्धती : ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती

गुणोत्तर व प्रमाण (Ratio and Proportion) | MPSC गणित | MPSC Mathematics

युरोपियनांचे भारतात आगमन