भारतीय पाणबुड्या

१) INS अरिहंत

 आयएनएस अरिहंत (S-73) ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी व्हेसल या गटातील मोडणारी ही भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे.

 भारताची ही पहिलीच आण्विक पाणबुडी असून यापूर्वी भारताने रशिया कडून आण्विक पाणबुडी भाडेतत्वावर घेतली होती.

 अरिहंतचा अर्थ शत्रूचा नाश करणारी असा होतो. भारतीय नौदलाला अशा आण्विक पाणबुडीची जागतिक स्तरावर ठसा उमटवण्यासाठी तीव्र गरज होती. सुमारे तीस हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प यासाठी १९८० मध्ये सुरू झाला. दोन दशके या पाणबुडीची उभारणी चालू होती. ही उभारणी विशाखापट्टणम येथील गोदीत करण्यात आली.

अरिहंतची क्षमता

 क्षमता - ६,००० टन
 लांबी - ११० मीटर
 रुंदी - १२ मीटर
 आण्विक प्रक्रियक - ८५ मेगावॉट
 वेग - २२ ते २८ किमी प्रति तास
 शिबंदी - ९५-१०० खलाशी व अधिकारी
 क्षेपणास्त्रे - १२

प्रगती

 भारतीय बनावटीच्या आय.एन.एस. अरिहंतवरील आण्विक प्रक्रियक ९ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी रात्री कार्यान्वित करण्यात आला. नौदलामध्ये दाखल करून घेण्याआधी आणखी काही चाचण्या करण्यात येतील.

२)आय एन एस सिंधुरक्षक

 आय. एन. एस. सिंधुरक्षक एक रशियन निर्मित किलो वर्गाची भारतीय नौदलाची पाणबुडी होती. ही पाणबुडी २४ डिसेंबर, इ.स. १९९७ रोजी नौदलात सामील करण्यात आली, ही किलो वर्गातील १० पैकी ९वी पाणबुडी होती. ४ जून, इ.स. २०१० रोजी भारतीय संरक्षण मंत्री आणि ज्वेजदोच्का गोदी ह्यांनी पाणबुडीच्या आधुनिकीकरण आणि आवश्यक दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटी अमेरिकन डॉलरच्या करारावर सह्या केल्या. आवश्यक दुरुस्ती आणि आधुनिकीकरणानंतर ही पाणबुडी रशियाकडून भारतीय नौदलाला मे-जून इ.स. २०१३ दरम्यान परत करण्यात आली.

अपघात

 पाणबुडीवर इ.स. २०१० मध्ये किरकोळ आणि १४ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी भीषण आग लागण्याच्या घटना घडल्या. त्याचा परिणाम म्हणून, मुंबई नौदल गोदीत या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यावेळी पाणबुडीवरील १८ खलाशी मृत्यमुखी पडले.

बांधणी

 आय.एन.एस. सिंधुरक्षक पाणबुडीची बांधणी, रशियातल्या सेंट पीटर्सबर्गशहराच्या ॲडमिरॅलिटी गोदीमध्ये झाली. . बांधणीची सुरुवात १९९५ मध्ये झाली. तर डिसेंबर १९९७ मध्ये ती पाणबुडी भारतात पोहचवली गेली.

३) आय.एन.एस. सिंधुशस्त्र

 आय.एन.एस. सिंधुशस्त्र (एस६५) ही भारताची सिंधुघोष वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे.

 ही पाणबुडी जुलै १९, इ.स. २००० रोजी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली. बावन्न खलाशी व अधिकाऱ्यांना घेउन सलग ४५ दिवस पाण्याखाली राहण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

४)शिशुमार वर्गाच्या पाणबुड्या

 शिशुमार वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या पाणबुड्यांचा प्रकार आहे. या पाणबुड्या जर्मनीत बांधल्या गेल्या. या वर्गातील पाणबुड्या पाण्याखाली असताना विद्युत शक्ती तर पाण्याच्या वर असताना डीझेल इंधनावर चालविल्या जातात.

 इ.स. १९८१ मध्ये भारत व जर्मनी यांच्यात झालेल्या करारांतर्गत यांची बांधणी केली गेली व इ.स. १९८६ ते इ.स. १९९४ दरम्यान या पाणबुड्या भारतीय आरमाराला दिल्या गेल्या.

 या वर्गात एकूण चार पाणबुड्या आहेत. याशिवाय अधिक दोन पाणबुड्या बांधायचा करार असताना इ.स. १९९८मधील पोखरण २ अण्वस्त्र चाचणीनंतर जर्मनीने या पाणबुड्या भारतास देण्यास नकार दिला.

वापरकर्ते देश - भारत

 पाणबुड्या

 आयएनएस शिशुमार
 आयएनएस शंकुश
 आयएनएस शल्की
 आयएनएस शंकुल.

)आय.एन.एस. चक्र

 आय.एन.एस. चक्र ही भारतीय आरमाराची अकुला वर्गातील अणुशक्ति चलित लढाऊ पाणबुडी आहे. रशियन बनावटीची ही पाणबुडी जानेवारी २३, इ.स. २०१२ रोजी सेवेत दाखल झाली. याचे पूर्वीचे नाव के-१५२ नेर्पा असे होते. ही पाणबुडी दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेण्यात आली. ७३ नौसैनिकांसह पाण्याखाली सलग १०० दिवस राहण्याची तिची क्षमता आहे.

६)आय.एन.एस. विक्रांत (आर ११)

 आय.एन.एस विक्रांत (आर ११) (पूर्वीचे एच.एम.एस. हर्क्युलिस (आर ४९) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. हे जहाज सप्टेंबर २२, १९४५ रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले.

 जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४ इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.

 जानेवारी ३१, १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.

 इतिहास

 मार्च १९६२मध्ये एच.एम.एस. सेन्टॉरवरुन दिसणारे विक्रांत
या नौकेची बांधणी उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुरू करण्यात आली. महायुद्ध संपल्यावर बांधणीचे काम स्थगित करण्यात आले व याचा ध्वजक्रमांक R49 बदलून R11 करण्यात आला.

 भारताने विकत घेतल्यावर उरलेले बांधकाम हार्लांड अँड वूल्फ या कंपनीने पूर्ण केले.अनेक आधुनिक उपकरणांसह नौकेच्या डेक[मराठी शब्द सुचवा]वर वाफेवर चालणारे विमानफेकी यंत्र (कॅटेपुल्ट) बसवण्यात आले तसेच नियंत्रणकक्षातही आमूळ बदल करण्यात आले.

 हॉकर सी हॉक विमान
या नौकेचा प्रथम कमांडिंग ऑफिसर कॅप्टन प्रीतम सिंगच्या नेतृत्त्वाखाली विक्रांत नोव्हेंबर ३, इ.स. १९६१ रोजी मुंबईच्या बॅलार्ड पियर येथे भारतीय आरमारात दाखल झाले.

 विक्रांतवर सुरुवातीला युनायटेड किंग्डमकडून विकत घेतलेली हॉकर सी हॉक प्रकारची लढाऊ-बॉम्बफेकी विमाने तसेच फ्रांसकडून विकत घेतलेली ब्रेग्वे अलिझ प्रकारची पाणबुडीविरोधी विमाने होती. लेफ्टनंट आर.एच. ताहिलियानीने मे १८, १९६१ रोजी पहिले विमान विक्रांतवर उतरवले.

७) आयएनएस विक्रमादित्य

 आय.एन.एस. विक्रमादित्य हे भारतीय आरमारातले एक विमानवाहू जहाज आहे. हे नोव्हेंबर २०१३मध्ये आरमारी सेवेत रुजू झाले.

 याआधी विक्रमादित्य सोव्हियेत संघाच्या आरमारात होते. त्यावेळी त्याचे नाव ॲडमिरल गोर्श्कोव होते. कीयेव प्रकारच्या विमानवाहू नौकांपैकी एक असलेले विक्रमादित्य १९७८-८२ दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात आले. भारतीय आरमारात दाखल होण्यापूर्वी याची पुनर्बांधणी रशियातील सेव्हेरोद्विन्स्क येथील सेवमाश गोदीमध्ये केली होती..

 सामील

 हे विमानवाहू जहाज दि.१६ नोव्हेंबर २०१३ रोजी भारतीय नौदलात औपचारिकपणे सामील करण्यात आले आहे. रशियाच्या सेवमाश शिपयार्ड येथे ते जहाज भारतीय नौदलाच्या स्वाधीन करण्यात आले. हे जहाज भारतात पोचण्यास दोन महिन्याचा अवधी लागला. यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली आहे.

 इतर माहिती

 किंमत - २.३ अब्ज डॉलर
 वजन - ४४५०० टन
 लांबी - २८४ मीटर


Popular posts from this blog

होमरुल चळवळ - डॉ. ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक | Homerule Movement

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

कायमधारा पद्धती : ब्रिटिशकालीन जमीनदारी पद्धती

गुणोत्तर व प्रमाण (Ratio and Proportion) | MPSC गणित | MPSC Mathematics

युरोपियनांचे भारतात आगमन