तिहेरी तलाक अधिनियम - Tiheri Talaq Bill (Triple Divorce Act)
मुस्लीम पुरुषांनी दिलेल्या तत्काळ तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारे वादग्रस्त 'मुस्लीम महिला (वैवाहिक अधिकारांचे संरक्षण) अध्यादेश, 2019 (तिहेरी तलाक विधेयक या नावानेही परिचित)चे विधेयकात रूपांतर करून हे विधेयक 2 5 जुलै 2019 रोजी लोकसभेत तर 30 जुलै 2019 रोजी राज्यसभेत पारित करण्यात आले. पुढे या विधेयकाला राष्ट्रपतीनी संमती दिल्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. या कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी (म्हणजे कायदा करण्यापूर्वीच्या तारखेप्रमाणे) स्वरूपाने म्हणजे 19 सप्टेंबर 2018 पासूत केली जाईल. तिहेरी तलाकचा प्रश्न हा केवळ एखाद्या समुदायापुरता किंवा केववळ मुस्लीम महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा नव्हता तर, या मुद्याच्या असलेल्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय पैलूंमुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनला. या विषयावर कायदा झाल्यामुदे आता मुस्लीम महिलांचे सर्व प्रश्न निकाली निघाले आहेत किंवा या कायद्यामुठे काहीच साध्य होणार नाही, आशा परस्परविरोधी दोन टोकांच्या भूमिका न घेता या विषयाचा सांगोपांग विचार करणे आवश्यक आहे. या चिकित्सक भूमिकेतूनच या प्रश्न...