राष्ट्रीय उत्पन्न | National Income
जागतिक महामंदीनंतर अमेरिकेमध्ये शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न झाला.
इतिहास तज्ज्ञांच्या मते इ.स. १ ते १००० पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. तसेच १७ व्या शतकात मुगल काळात जगातील GDP मध्ये भारताचा २३.७% वाटा होता. तो १९१३ मध्ये ब्रिटिश राजवटीत ७.६% इथपर्यंत खाली आला.
इतिहास
1867-68 दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाहणीनुसार त्यावेठी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी रुपये तर दरडोई उत्पन्न रु. 20 होते.
1911 फिन्डले शिरास यांना भारताचे दरडोई उत्पन्न 49 रु. इतके आढठ्ठले.
1913-14 वाडिया आणि जोशी यांना भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1067 कोटी रुपये तर दरडोई उत्पन्न्थ 90 रुपये इतके आढठ्ठले.
1931-32 व्ही. के. आर. व्ही. राव यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी सर्वप्रथम शास्त्नीय पद्धतीह्ला/अवलंब केला. त्यांच्या पाहणी नुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 1689 कोटी रुपये तर दरड़ोई उत्पन्न 62 रु इतके होते.
1949 राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना -
अध्यक्ष - डॉ. पी. सी. महालनोबिस
सदस्य - प्रो. डी. आर. गाडगीव्ठ आणि डॉ. व्ही. के. व्ही राव.
या समितीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 8650,/कोटी रूपये तर दरडोई उत्पन्न 246.90 रु. असण्याचा अंदाज होता.
अध्यक्ष - डॉ. पी. सी. महालनोबिस
सदस्य - प्रो. डी. आर. गाडगीव्ठ आणि डॉ. व्ही. के. व्ही राव.
या समितीनुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 8650,/कोटी रूपये तर दरडोई उत्पन्न 246.90 रु. असण्याचा अंदाज होता.
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
उत्पाद पद्धत / Product Method :-
एका आर्थिक वर्षात देशांतर्गत निर्माण होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारमूल्य काढले जाते. यालाच GDP किंवा स्थूल देशांतर्गत उत्पाद असेही म्हणतात.
उत्पन्न पद्धत /Income Method :-
या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एका आर्थिक वर्षात देशातील कुटुंबसंस्थांनी कमावलेले एकूण उत्पन्न
मोजतात.
मोजतात.
खर्च पध्दत /Expenditure Method :-
एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये करण्यात औल्लेला एकूण खर्च या पद्धतीत मोजला जातो.
या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ,पुढील सुत्रांचा वापर करतात.
या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी ,पुढील सुत्रांचा वापर करतात.
राष्ट्रीय उत्पन्न = C+I+G + (X-M)